न्यायालयाने पोलिसांकडून मागितला तपास प्रगती अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:09 AM2021-02-06T04:09:45+5:302021-02-06T04:09:45+5:30
कंगना ट्विटर वाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल यांनी ट्विटरवर ...
कंगना ट्विटर वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल यांनी ट्विटरवर प्रक्षोभक पोस्ट टाकून दोन समाजांत तेढ निर्माण केल्याचा आरोप केलेल्या तक्रारीचा तपास प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकऱ्यांनी मुंबई पोलिसांना शुक्रवारी दिले.
पोलिसांनी अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागितला. तक्रारदार अली खशिफ खान देशमुख यांनी यावर आक्षेप घेतला. पोलिसांना सर्व पुरावे दिले असूनही ते विलंब करीत आहेत. ५ जानेवारी रोजी न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यासाठी अखेरची संधी दिली होती. तरीही न्यायालयाने आंबोली पोलिसांना ४ मार्चपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
सोशल मीडियाद्वारे कंगना व तिची बहीण देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असे म्हणत व्यवसायाने वकील असलेले अली खाशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायालयात कंगना व तिच्या बहिणीविरोधात खासगी तक्रार केली.
.........................................