Join us

मालेगाव स्फोटातील आरोपींना कोर्टाची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 3:45 AM

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी गैरहजर राहिल्याने शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींना फैलावर घेतले.

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी गैरहजर राहिल्याने शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींना फैलावर घेतले. यापुढे हे वर्तन सहन केले जाणार नाही. योग्य ती कारवाई करू, अशी तंबी न्यायालयाने आरोपींना दिली.मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाचेन्या. विनोद पडळकर शुक्रवारी आरोपींवर आरोप निश्चित करणार होते. मात्र, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णीया दोघांव्यतिरिक्त अन्य पाचआरोपी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत.न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत म्हटले की, आरोपी जाणूनबुजून सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. ते विलंब करीत आहेत. आता शेवटचीसंधी देतो. पुढच्या सुनावणीस अनुपस्थित राहिलात तर कारवाई करण्यात येईल.दरम्यान, बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायद्याखाली राज्य सरकारने पुरोहित व अन्य आरोपींवर कारवाईस दिलेली मंजुरी योग्य असल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले. त्याविरोधात पुरोहितने केलेला अर्ज उच्च न्यायालयाने दाखल करून घेतला. मात्र, तत्काळ सुनावणीस नकार दिला.