Join us

नीरव मोदीला न्यायालयाने बजावली ‘कारणे-दाखवा’ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

पीएनबी घोटाळालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने ‘कारणे-दाखवा’ नोटीस ...

पीएनबी घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. आर्थिक फरार गुन्हेगार कायद्यांतर्गत त्याची संपत्ती का जप्त केली जाऊ नये? याचे स्पष्टीकरण न्यायालयाने मोदीकडून मागितले आहे, तसेच विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. सी. बर्डे यांनी मोदी याला ११ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही तर आर्थिक फरार गुन्हेगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे न्या. बर्डे यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने नीरव मोदी याला आर्थिक फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. ईडीने अर्जामध्ये नमूद केलेल्या मोदी याची संपत्ती का जप्त करण्यात येऊ नये? असे न्या. बर्डे यांनी करणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये १४,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने नीरव मोदी व त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.