Court: खडसेंच्या जावयाने हडपला भाेसरीचा भूखंड; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:42 AM2023-04-19T08:42:29+5:302023-04-19T08:42:51+5:30

Court: माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील भूखंड हडपल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Court: Khadse's son-in-law grabbed Bhasari's plot; High Court observation | Court: खडसेंच्या जावयाने हडपला भाेसरीचा भूखंड; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Court: खडसेंच्या जावयाने हडपला भाेसरीचा भूखंड; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

googlenewsNext

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील भूखंड हडपल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सहआरोपी एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे यांनी कायदेशीररीत्या मंजूर नसलेल्या आणि गुन्हेगारी कृत्यांतून मिळवलेली मालमत्ता शेड्यूल गुन्ह्याशी संबंधित आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला. 

महसूल मंत्री या नात्याने खडसे यांना सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचे किंवा सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. परंतु, अशा अधिकारांचा वापर स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक किंवा अन्य अनुचित फायदा मिळविण्यासाठी करायला नको होता, असे निरीक्षण न्या. अनुजा प्रभुदेसाई  यांच्या एकलपीठाने चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले. १० एप्रिल रोजी न्यायालयाने चौधरी यांना दिलासा देण्यास नकार दिला. मंगळवारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाली.

भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड बाजारभावापेक्षा अगदी किरकोळ किमतीला खरेदी करून एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांनी सरकारचे आर्थिक नुकसान केल्याचा ईडीचा दावा आहे. गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

भोसरी भूखंड घाेटाळा
सादर केलेल्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, अर्जदाराने (चौधरी) विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून ५.५३ कोटी रुपये जमा केले. नंतर ही रक्कम वळती केली. ते गुन्ह्याशी संबंधित उपक्रमांत सहभागी होते. त्यामुळे त्यांनी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे, असे न्यायालयाने म्हटले.  

Web Title: Court: Khadse's son-in-law grabbed Bhasari's plot; High Court observation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.