मुंबई : आरोपींना खटला जलदगतीने चालविण्याची विनंती करण्याचा अधिकार आहे. परंतु, पुढील तपास किंवा खटल्याबाबत ते काहीही बोलू शकत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना सुनावले.
कॉ. पानसरे हत्येचा तपास व खटला उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्याने त्याला विरोध करणारी याचिका आरोपींनी दाखल आहे. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे नेसुनावणी झाली. कोर्ट म्हणाले की, पुढील तपास करण्याची बाब येते, तेव्हा आरोपीचे अधिकार वेगळे असतात. आम्ही खटल्याला स्थगिती दिलेली नाही. खटला सुरूच आहे. पुढील तपासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे तर त्याबाबत तुम्ही काहीही बोलू शकत नाही.
तपासावर देखरेख ठेवताना न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे गेली सात वर्षे खटल्याचे कामकाज थांबले आहे, असे आरोपींचे वकील सुभाष झा यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादावर असहमती दर्शवली. तपासावर उच्च न्यायालयाने देखरेख ठेवावी, यासाठी पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.