सहा जणांची याचिका न्यायालयाने फेटाळली

By admin | Published: December 2, 2015 02:22 AM2015-12-02T02:22:16+5:302015-12-02T02:22:16+5:30

महापालिका अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे नगरसेवक अशा सहा जणांनी 'लकी कंपाउंड दुर्घटना प्रकरणा'तून आपली नावे वगळण्यात यावी, अशा आशयाची याचिका ठाणे विशेष न्यायालयाचे

The court rejected the petition of six people | सहा जणांची याचिका न्यायालयाने फेटाळली

सहा जणांची याचिका न्यायालयाने फेटाळली

Next

ठाणे : महापालिका अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे नगरसेवक अशा सहा जणांनी 'लकी कंपाउंड दुर्घटना प्रकरणा'तून आपली नावे वगळण्यात यावी, अशा आशयाची याचिका ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी फेटाळली आहे.
शीळफाटा येथील लकी कंपाउंडमधील आदर्श ‘ए’ या इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले होते. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी २७ जणांना अटक केली. महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि नगरसेवक हे सध्या जामीन मिळवून बाहेर आहेत. दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील, पालिकेचे तत्कालीन उपायुक्त एस. सरमोकदम, सहायक आयुक्त शाम थोरबोले, लिपिक सुभाष वाघमारे, वाहनचालक रामदास बुरु ड, छायाचित्रकार विष्णू घुमरे यांनी आमची नावे वगळावीत अशी याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याची माहिती सरकारी वकिल शिशिर हिरे दिली.

दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील, पालिकेचे तत्कालीन उपायुक्त एस. सरमोकदम, सहायक आयुक्त शाम थोरबोले, लिपिक सुभाष वाघमारे, वाहनचालक रामदास बुरु ड, आणि छायाचित्रकार विष्णू घुमरे यांनी आमचा थेट सहभाग नसल्याने, आमची नावे या प्रकरणातून वगळावीत, अशी याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती.

Web Title: The court rejected the petition of six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.