मुंबई : राज्यातील सर्व कारागृहांची दुर्दशा पाहून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले. राज्यातील ६० कारागृहांची किती क्षमता आहे आणि कोरोनाबाधित असलेल्या कैद्यांना वेगळे करण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ज्या कैद्यांना व अंडरट्रायल्सना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांची चाचणी न केल्याबद्दल संताप व्यक्त केला.चार कैद्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे समजले, याची नोंद न्यायालयाने घेतली. अतिरिक्त महासंचालक (कारागृह) यांनी न्यायालयात यासंदर्भात एक अहवाल सादर केला. यात लक्षणे नसलेल्या कैद्यांची चाचणी होत नाही. कारण त्यांना वेगळे ठेवण्यास जागा नाही, असे नमूद आहे. या अहवालाद्वारे कारागृहांची दुर्दशा समजते. अंडरट्रायल्स चौघांचा कोरानामुळे मृत्यू झाल्यानंतर २६ नमुने गोळा केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.पुढील सुनावणी उद्यामहाअधिवक्ता यांना विनंती करतो की, त्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे आणि कोरोनाबाधित रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याच्या करण्यात आलेल्या आरोपाबाबत कारागृह प्रशासनाकडून योग्य त्या सूचना घ्याव्यात, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी शुक्रवारी ठेवली.
कारागृहांच्या दुर्दशेबाबत कोर्टाने सरकारला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:11 AM