Court: 'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By दीप्ती देशमुख | Published: September 15, 2022 04:38 PM2022-09-15T16:38:43+5:302022-09-15T16:39:28+5:30

Court News: 'अनाथ' शब्दाऐवजी 'स्वनाथ' शब्द प्रचलित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Court: Word 'Anath' not objectionable, High Court rejects plea challenging word 'Anath' | Court: 'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Court: 'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

googlenewsNext

मुंबई : 'अनाथ' शब्दाऐवजी 'स्वनाथ' शब्द प्रचलित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले.

ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, त्यांना असुरक्षिततेच्या सामना करावा लागतो आणि अस्तित्त्वात असलेला अनाथ शब्द 'गरजू' व 'असुरक्षित' मुले  असे प्रतिबिंबित करतो, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेत पालक नसलेल्या मुलांसाठी 'अनाथ' हा शब्द कित्येक वर्षांपासून  वापरला जात आहे, असे निरीक्षण मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने नोंदविले. 

'अनाथ' हा शब्द एकप्रकारे कलंक आहे, या याचिकाकर्त्याच्या मताशी आम्ही सहमत नाही. याचिकाकर्ता ज्या ट्रस्टशी संबंधित आहे, त्या ट्रस्टचे नाव बदलण्याचा प्रयत्न याचिकाकर्ता करत आहे. राज्य सरकारकडे याबाबत विचारणा करावी, अशी परिस्थिती नाही. मुळातच 'अनाथ' हा शब्द बदलण्याची आवश्यकता नाही,' असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली.

अनाथ शब्द बदलून स्वनाथ शब्द प्रचलित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका स्वनाथ फाउंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्रस्तावित स्वनाथ हा शब्द 'स्वावलंबी' आणि 'आत्मविश्वास' दर्शविणारा आहे, असा युक्तिवाद  फाउंडेशनतर्फे  ऍड. उदय वारुंजीकर यांनी केला.

अनाथ हा शब्द पालक नसलेल्या मुलांसाठी वापरतात. त्यात अयोग्य काय? काही जनहित याचिकादार आता येतात आणि शब्द बदल, असे म्हणतात. त्यांना भाषाशास्त्र माहीत आहे का? नेहमी आमचेच (न्यायालय) मत  योग्य आहे आणि प्रशासनाचे मत योग्य नाही, असे नाही. कधी कधी आम्हालाही 'लक्ष्मणरेखा' आखावी लागते. प्रत्येक प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Web Title: Court: Word 'Anath' not objectionable, High Court rejects plea challenging word 'Anath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.