‘फॅन’ प्रदर्शनाला न्यायालयाचा हिरवा कंदील

By admin | Published: April 12, 2016 03:29 AM2016-04-12T03:29:45+5:302016-04-12T03:29:45+5:30

‘फॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे. कथेच्या कॉपीराईटच्या मुद्द्यावरून वाद उपस्थित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला

Court's Green Lantern to display 'Fan' | ‘फॅन’ प्रदर्शनाला न्यायालयाचा हिरवा कंदील

‘फॅन’ प्रदर्शनाला न्यायालयाचा हिरवा कंदील

Next

मुंबई : ‘फॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे. कथेच्या कॉपीराईटच्या मुद्द्यावरून वाद उपस्थित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने यशराज फिल्मस् आणि शाहरूख खानने दोन आठवड्यांत कॉपीराईट्स संदर्भात उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
१५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅन’ची कथा आपण लिहिलेल्या कथेप्रमाणे असल्याचा दावा लेखक- दिग्दर्शक महेश डोईजोडे यांनी उच्च न्यायालयात केला. डोईजोडे यांच्या म्हणण्यानुसार, १९९७ साली यश चोप्रा तर १९९८ साली शाहरूख खानला त्यांनी कथा ऐकवली होती. कथा ‘अभिनेता’ नावाने नोंदवल्याचा दावाही डोईजोडे यांनी केला. प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी विनंती त्यांनी केली होती. ही मागणी न्यायाधीश गौतम पटेल यांनी धुडकावली.

Web Title: Court's Green Lantern to display 'Fan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.