Join us

रोमिन छेडाला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार; गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 8:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय रोमिन छेडा याने ऑक्सिजन पुरवठा घोटाळाप्रकरणी दाखल केलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय रोमिन छेडा याने ऑक्सिजन पुरवठा घोटाळाप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने त्यावर तत्काळ सुनावणी घेऊन अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

छेडा याच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने नकार दिला. ‘तातडीने सुनावणीची काय आवश्यकता आहे. ईओडब्ल्यूला तपास करू द्या,’ असे खंडपीठाने म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मार्चमध्ये ठेवली. 

तपासाच्या केंद्रस्थानी एचसीसी कंपनी कोविडदरम्यान ऑक्सिजन सिलिंडर घोटाळा केल्याने छेडावर गुन्हा दाखल करण्यात आला. २४ नोव्हेंबर रोजी ईओडब्ल्यूने त्याला  अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आता या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. छेडाच्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी (एचसीसी) पॉवर ऑफ ॲटर्नी देण्यात आली आहे आणि संपूर्ण तपासाच्या केंद्रस्थानी एचसीसी कंपनी आहे. कारण कोरोनादरम्यान रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. अशा प्रकारचे काम करण्याचा अनुभव नसताही या कंपनीला नऊ पालिका रुग्णालये व दोन जम्बो कोविड सेंटर्सजवळ ऑक्सिजन प्लांट लावण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र, या प्लांटचे काम पूर्ण करण्यात आले नाही, असा आरोप छेडावर आहे. 

टॅग्स :धोकेबाजी