पोरींचा दावा विराटच छावा!

By Admin | Published: March 23, 2015 10:46 PM2015-03-23T22:46:47+5:302015-03-23T22:46:47+5:30

क्रिकेटवेडे फक्त मुलचं असतात, हा गोड गैरसमज आहे. आता त्या पुढे जाऊन ‘गर्ल्स गँग’ही धमाकेदार खेळी करताना दिसतेय.

Cousins ​​claim Virat Chhava! | पोरींचा दावा विराटच छावा!

पोरींचा दावा विराटच छावा!

googlenewsNext

क्रिकेटवेडे फक्त मुलचं असतात, हा गोड गैरसमज आहे. आता त्या पुढे जाऊन ‘गर्ल्स गँग’ही धमाकेदार खेळी करताना दिसतेय. मात्र दुसऱ्या बाजूला केवळ विराट, धोनी, रैना, मोहित, बोल्ट, मॅकिलम, मायकल क्लार्क, डिविलअर्स अशा हॅण्डसम हंकची एक झलक पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसणाऱ्या मुलीही कमी नाहीत. त्यामुळे वर्ल्डकप फिव्हर चढतोय, त्याला हे कारणंही पुरेसं आहे. शिवाय, केवळ इंडियाच्या टीममधीलच नव्हे गर्ल्सगँगने तर त्याही पुढे जाऊन न्यूझिलंड, आॅस्ट्रेलियाच्या टीममधील ‘हॅण्डसम’ प्लेअर्सच्या प्रेमात आहे. अनुष्कामध्ये एवढं काय आहे? असा थेट सवाल ‘युवागिरी’च्या माध्यमातून विराटच्या गर्ल्स फॅन्सने त्याला केला आहे. वर्ल्डकपमधील ‘लूक्स’च्या मॅचबद्दल गर्ल्स गँगला विचारले असता, अनेक नावे समोर आली आहे. तरीही, या गर्ल्स गँगमध्ये ‘विराट कोहली’च छावा असल्याचं दिसून आलयं. गर्ल्स गँगच्या याच हॅण्डसम चॉइसचा हा आढावा...

इंडियाच्या टीममधील सुरेश रैना ‘बेस्टेस्ट’ प्लेयर आहे. रैना दिसायलाही खूप हॅण्डसम आहे, शिवाय त्याच्या स्टाईल स्टेटमेंटवर तर मी फिदा आहे. त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे काहीसं ‘हार्टब्रेक’झालं असलं तरी, मला तो आवडतो आणि कायमच आवडणार. आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्येही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे तो वर्ल्डकप जिंकूच अशी आशा आहे.
- सोनाली कदम (विद्यार्थिनी)

‘मौका’ तर आपलाच !
वर्ल्डकप आता ‘क्लायमेक्स’वर आल्याने क्रिकेटवेड्यांच्या मनातील धाकधुक वाढतेय. त्यात आता इंडियाचे जुने शत्रू असलेल्या आॅस्ट्रेलिया विरोधात सेमी फायनल रंगणार असल्याने चर्चा जोरात आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये पहिली सेमी फायनल आहे. धोनी ब्रिगेडला आपलाच ‘मौका’ असे म्हणत कांगारुंना लोळावण्याचा निर्धारच केलाय.

विराट...वी लव्ह यू!

फक्त एका अ‍ॅडमुळे विराट-अनुष्काचे प्रेम जमले, त्यामुळे त्यांच्या या अफेअरबद्दल फार काही वाटत नाही. विराट...नुसतेच नाव घेतले तरी त्यापुढे ‘वी (अ‍ॅक्चुअली ‘आय’) लव्ह यू...’ असे पुढे म्हणावेच वाटते. बॉलीवूडमधल्या हिरोंपेक्षाही विराटच्या स्टाईल स्टेटमेंटवर माझं लक्ष असतं. त्यामुळे मॅच असो वा नसो ‘विराट’ शोध सुरुच असतो.
- पूजा देसाई (विद्यार्थिनी)

... तर आम्ही वाघ!
इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावत सेमीफायनलला पोहचली त्याचा खूप आनंद आहे. पण सेमी फायनलमध्ये भारताच्या टीमसमोर आॅस्ट्रेलिया तगडे आव्हान आहे. त्यामुळे खेळाच्या सुरुवातीपासूनच भारताच्या टीमला आॅस्ट्रेलिया समोर जास्त रनचे आव्हान ठेवणे गरजेचे आहे. ‘कांगारु’ म्हणून माज करणाऱ्या आॅस्ट्रेलियाच्या टीमला आम्ही पण वाघ आहोत हे त्या दिवशी कळेलच.
- रोशन करबेले (व्हिडिओ एडिटर)

धोनी फेव्हरेट...
क्रिकेट मॅच सुरु झाली की ‘धोनी’ची स्टाईल बघण्यासाठी मी टीव्हीसमोर बसते. त्याने सुरुवातीला क्रिकेटमध्ये एन्ट्री घेतली तेव्हापासून तो मला आवडतो. त्यावेळी त्याची हेअरस्टाईलपासून आताचा ‘लूक’ एकदम डॅशिंग आहे. शिवाय, जसा तो दिसण्यात ‘कूल’ आहे, तसाच तो खेळण्यातही जो ‘कूलनेस’ दाखवितो त्याच्याच प्रेमात मी आहे. - दीपाली कोकरे (विद्यार्थिनी)

संधी साधणारच!
सेमी फायनलमध्ये विराट, शिखर आणि रोहित या खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. वर्ल्डकपचा आतापर्यंतचा इंडियाचा ग्राफ चांगला असल्याने ही संधी आपणच साधणार हा विश्वास आहे. शिवाय, कूल कॅप्टन असलेला ‘धोनी’ वर्ल्डकप घेऊन येणारच त्यामुळे यंदा सॉलिड्ड धम्माल सेलिब्रेशन असणारेय.
- अखिल दळी (फोटोग्राफर)

विराटच हीरो
विराटने क्रिकेटमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच त्याला लाइक करतेय. म्हणजे, वरुण धवन, ह्रतिक रोशन, अर्जुन कपूर आणि स्वप्निल जोशीनंतर तोच माझं फर्स्ट क्रश आहे. त्यामुळे विराटच हीरो आहे...तो कसला हॅण्डसम दिसतो क्रिकेट खेळताना..बस्स बघतचं राहावसं वाटतं. त्यामुळे त्याने साइड बाय साइड मॉडेलिंग करावं, म्हणजे त्याचा स्टाईलिश फंडा युथपर्यंत पोहोचेल.
- मनाली बागवे (विद्यार्थिनी)

चिअर्स फॉर इंडिया
सेमी फायनलला पोहचण्याचा खूप आनंद आहे. भारताची टीम सेमी फायनलला पोहचल्यामुळे खूप आनंद होतोय. सेमी फायनल जिंकणे चॅलेजिंग आहे. कारण समोर आॅस्ट्रेलिया टीम खेळणार आहे.त्यामुळे स्पिनर खेळाडूने चांगली कामगिरी बजावत आॅस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या खेळाडूंना आऊट करावे जेणे करुन भारताला पुढची खेळी सोपी होईल.
- अश्विन महाजन (विद्यार्थी)

विराटशिवाय आहेच
कोण!
सचिन तेंडुलकरनंतर डायरेक्ट मी विराटच्याच प्रेमात पडलेय. म्हणजे सचिनला तोड नाहीच, पण विराट कसला ‘क्यूट’ दिसतो. विराट खेळतोही भन्नाट, त्यामुळे तो मैदानात आला की बस्स! विराटमुळे कधी कधी माझं फ्रेंड्ससोबत भांडण होतं. आता त्याच्यामुळेच आपण वर्ल्डकप जिंकणार आहोत हे नक्की आहे. - सुप्रिया करबेले (सॉफ्टवेअर इंजिनिअर)

कांगारुंवर मात करणारच
वर्ल्डकप सुरु झाल्यापासून सलग विजयी होत असल्याने आपला आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे आॅस्ट्रेलिया असो श्रीलंका यावेळी वर्ल्डकप आपलाच असणारेय. आॅस्ट्रेलियाशी असलेली आपली ठसन या सेमीफायनलमध्ये रंग भरणार असून काही केल्या आपण कांगारुंवर मात करणारे हे नक्की.
- ऋतुराज सरेकर (विद्यार्थी)

Web Title: Cousins ​​claim Virat Chhava!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.