Mumbai Corona Updates: धोक्याची घंटा! धारावी, माहिम, दादरमध्ये पुन्हा वाढतोय करोना; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:47 PM2021-04-01T19:47:55+5:302021-04-01T19:49:44+5:30
Mumbai Corona Updates: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी-दक्षिण विभागात गेल्या २४ तासांत तब्बल २७६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Mumbai Corona Updates: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी-दक्षिण विभागात गेल्या २४ तासांत तब्बल २७६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यात एकट्या धारावीमध्ये आज ७१ नवे कोरोना रुग्ण वाढले असून धारावीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ९८५ पर्यंत पोहोचली आहे. सध्या धारावीत एकूण ६२९ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर ४ हजार ३९ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू
दुसरीकडे दादरमध्ये गेल्या २४ तासांत १०४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दादरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ६ हजार १८४ इतकी झाली आहे. दादरमध्ये आतापर्यंत एकूण ५ हजार ९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ९२७ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, माहिम परिसरात सध्या १०७० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५०६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज माहिम परिसरात १०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. माहिम मधील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार २८७ इतकी झाली आहे.
बाजारपेठा एक दिवस आड सुरू राहणार, लोकल प्रवासावर मर्यादा; मुंबईच्या महापौरांचे संकेत
आज दिवसभरात माहिममध्ये ६१३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर दादरमध्ये एकूण ३६० जणांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
मुंबईच्या जी-दक्षिण विभागात धारावी, दादर आणि माहिम परिसराचा समावेश होतो. या विभागात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होताना दिसून येत आहे. जी-दक्षिण विभागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ४५६ इतकी झाली आहे. या विभागात सध्या २६२६ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १४ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.