कोविड - १९; राज्यात नऊ जण निरीक्षणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:20 AM2020-03-05T05:20:43+5:302020-03-05T05:20:53+5:30

केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व कोरोना (कोविड - १९)बाधित देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Covid - 19; Nine people are under observation in the state | कोविड - १९; राज्यात नऊ जण निरीक्षणाखाली

कोविड - १९; राज्यात नऊ जण निरीक्षणाखाली

Next

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ मार्चपर्यंत ५६३ विमानांमधील ६६,९७७ प्रवासी तपासण्यात आले. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व कोरोना (कोविड - १९)बाधित देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ७ जण मुंबईत तर नाशिक येथे एक व नांदेड येथे एक जण भरती आहे. इतर ६ जणांचे अहवाल गुुरुवारी प्राप्त होतील.
बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून ४५४ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विविध विलगीकरण कक्षांत १६७ जणांना भरती करण्यात आले आहे.
१६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे. भरती झालेल्या १६७ प्रवाशांपैकी १५८ जणांना रुग्णालयातून घरी सोडले, असे आरोग्य विभागाने सांगितले.
>२९३ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण
बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ४५४ प्रवाशांपैकी २९३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, नाशिक, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Web Title: Covid - 19; Nine people are under observation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.