किशोरी पेडणेकरांना दोन दिवसांचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:43 PM2023-09-04T15:43:52+5:302023-09-04T15:44:50+5:30
जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसांचा दिलासा आहे.
मुंबई
जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसांचा दिलासा आहे. बुधवारपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचं तोंडी आश्वासन किशोरी पेडणेकर यांना देण्यात आलं आहे. पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोवर पेडणेकर यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं आहे.
२९ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयानं पेडणेकर यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. त्यानंतर पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरोना काळात बॉडी बॅगची जादा दराने खरेदी, त्यातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसी कलम ४२० (फसवणूक), १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस कारवाई व अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी ॲड्. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.