मुंबईत कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:59+5:302021-07-29T04:07:59+5:30
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ३८३ दिवसांवर ...
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ३८३ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. २१ ते २७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या शहर-उपनगरात ५ हजार २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर-उपनगरात बुधवारी ४०४ रुग्ण व ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ३५ हजार १६५ आहे, तर मृतांचा आकडा १५ हजार ७९५ झाला आहे. मुंबईत दिवसभरात ३८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७ लाख ११ हजार ६९७ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
मुंबईत दिवसभरात ३२ हजार ३८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत एकूण ८० लाख ५० हजार ७५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत, तर प्रतिबंधित इमारतींची संख्या ५९ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ५४९ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत २४ दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर होता. आता जवळपास दुपटीने वाढून १३२४ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सात वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी दीड हजारांपार गेला आहे. .