Join us

CoronaVirus News: राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 11:29 AM

फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉ. ओक यांची प्रकृती स्थिर; लवकरच मिळणार डिस्चार्ज

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यातच राज्य सरकारनं स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.संजय ओक यांना आधीही कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. मात्र त्यांचं काम सुरूच होतं. काही दिवसांच्या उपचारांनंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. आपण योग्य वेळी काळजी घेतली तर कोरोनावर नक्कीच मात करू शकतो, असं ओक यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणेतील अनेकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे.धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफखुशखबर! 'या' औषधांच्या मिश्रणाने कोरोनाचा खात्मा होणार; रोगप्रतिकारकशक्तीही वाढणार

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या