हॉटेल पॅकेजमधून कोविड लस; आता होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:33+5:302021-05-31T04:06:33+5:30

द ललित या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची आकस्मिक पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलात ...

Covid vaccine from the hotel package; There will be an inquiry now | हॉटेल पॅकेजमधून कोविड लस; आता होणार चौकशी

हॉटेल पॅकेजमधून कोविड लस; आता होणार चौकशी

Next

द ललित या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची आकस्मिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलात पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांना समाजमाध्यमातून समजल्यानंतर या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची पेडणेकर यांनी रविवारी आकस्मिक पाहणी केली. पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. ललितमध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून, क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार आहे.

मुंबईतील काही हॉटेल त्यांच्या पॅकेजमधून कोविड लस देत आहेत, हे समजल्यानंतर पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ हॉटेलला भेट दिली. पाहणीदरम्यान लस ठेवण्यासाठी असलेल्या शीतपेट्यांचे व्यवस्थित परिरक्षण होत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना महापौरांनी जाब विचारला. पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेंटेन केली जात नव्हती. कोविड लसींचा साठा घरगुती वापराच्या फ्रिजमध्ये करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. परिणामी ‘द ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Covid vaccine from the hotel package; There will be an inquiry now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.