Join us

कोविशिल्डचा तिसऱ्या टप्प्यातील साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:07 AM

कोविशिल्डचा तिसऱ्या टप्प्यातील साठा उपलब्धउद्यापासून दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या आरोग्य विभागासह ...

कोविशिल्डचा तिसऱ्या टप्प्यातील साठा उपलब्ध

उद्यापासून दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविशिल्ड लसीचा तिसऱ्या टप्प्यातील साठा उपलब्ध झाला आहे. याखेरीज, आता पालिका प्रशासन येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ करत आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून १५ फेब्रुवारीपासून राज्यासह मुंबईत लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

सध्या मुंबई शहर उपनगराकरिता २ लाख ६० हजार डोसचा साठा उपलब्ध झाला आहे. या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. या लसींचा साठा गरजेनुसार लसीकरण केंद्रांवर पोहोचविला जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरात सध्या २३ लसीकरण केंद्र असून लवकरच या प्रक्रियेत खासगी वैद्यकीय संस्थांनाही समाविष्ट कऱण्यात येणार आहे. आतापर्यंत मुंबईत १ लाख ७ हजार ७२५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, आता लसीचे डोस उपलब्ध झाल्याने अधिकाधिक लाभार्थ्यांना लसीकरणासाठी जागरूक करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल. परिणामी कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पुढचे पाऊल असेल असा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

.......................