केईएमनंतर नायरमध्ये कोविशिल्ड लसीची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:43 AM2020-09-30T05:43:18+5:302020-09-30T05:43:58+5:30

कोरोनावरील उपचारासाठी केईएम रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्ड लसीचा प्रयोग शनिवारी सुरू झाला.

Covishield vaccine trial in Nair after KEM | केईएमनंतर नायरमध्ये कोविशिल्ड लसीची चाचणी

केईएमनंतर नायरमध्ये कोविशिल्ड लसीची चाचणी

Next

मुंबई : केईएम रुग्णालयात सुरू झालेल्या कोविशिल्ड लसीच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही ही चाचणी सुरू झाली. येथे तीन स्वयंसेवकांना सोमवारी लस देण्यात आली असून, आणखी २० स्वयंसेवकांवर ही चाचणी होईल.

कोरोनावरील उपचारासाठी केईएम रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्ड लसीचा प्रयोग शनिवारी सुरू झाला. यात तीन स्वयंसेवकांना लस दिली. त्यानंतर, नायर रुग्णालयात सोमवारी तिघांना लस देण्यात आली. लसीकरणानंतर सर्वांना एक तासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि नंतर घरी जाण्याची परवानगी मिळाली. तिघेही सुदृढ असून, त्यांना कोणत्याही आजाराचा इतिहास नाही. स्क्रीनिंगदरम्यान त्यांच्या आरटी-पीसीआर आणि अँटिबॉडी चाचण्याही करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले.

दुसºया टप्प्यात आम्ही त्यांच्या सुरक्षेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करू. यानंतर, काही दुष्परिणाम दिसल्यास त्याचीही माहिती घेण्यात येईल. रुग्णालयाने प्रक्रियेसाठी आणखी २० स्वयंसेवकांचे स्क्रीनिंग केले असून, त्यात तीन महिला आहेत. एकूण १०० जणांची टप्प्याटप्प्याने स्क्रीनिंग होणार असल्याची माहिती डॉ.भारमल यांनी दिली.
दरम्यान, स्वयंसेवकाचा चाचणीदरम्यान मृत्यू झाल्यास त्यांना एक कोटी रुपयांचे जीवन विम्याचे संरक्षण देण्यात येईल, तसेच लसीकरणामुळे काही विपरित परिणाम झाल्यास ५० लाखांचा वैद्यकीय विमा देण्यात येईल.

Web Title: Covishield vaccine trial in Nair after KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.