कोविशिल्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू, केईएममध्ये आजपासून देणार डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 09:04 AM2020-10-26T09:04:43+5:302020-10-26T09:05:10+5:30
Corona Vaccine : आतापर्यंत केईएममध्ये १०० जणांना डोस देण्यात आला. तसेच स्वयंसेवकंना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल.
मुंबई : ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या बहुप्रतीक्षित कोविड लसीच्या चाचणीचा दुसरा डोस येत्या सोमवारपासून केईएमच्या स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. केईएम रुग्णालयातील ही चाचणी नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल. त्यानंतर त्या स्वसंयेवकांचे चार महिने निरीक्षण केले जाईल. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असेल, अशी माहिती केईएम रुगणालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
आतापर्यंत केईएममध्ये १०० जणांना डोस देण्यात आला. तसेच स्वयंसेवकंना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल. २६ सप्टेंबरपासून किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात त्याची सुरुवात झाली. चाचण्यांच्या पहिल्या दिवशी २० त ४५ वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्यातील मानवी चाचणीचा भाग म्हणून डोस दिला गेला.
त्यानंतर २८ सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील तीन स्वयंसेवकांना कोविशिल्डची लस देण्यात आली. गेल्या २२ दिवसांत दोन्ही रुग्णालयंयामध्ये १६० हून अधिक स्वयंसेवकाना लसीचा डोस देण्यात आला. केईएम रुग्णालयात आतापर्यंत १०० जणाना, तर नायरमध्ये ६० हून अधिक स्वयंसेवकांना हा रोस देण्यात आला आहे.