शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:30 PM2020-09-04T16:30:14+5:302020-09-04T16:30:54+5:30

शिक्षकांची आंदोलने, अशैक्षणिक कामे, प्रलंबित मागण्या सुरूच

The cowardly warrior named Shikshak is ignored ...! | शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...!

शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...!

googlenewsNext

मुंबई : लॉकडाऊन काळात चेकपोस्ट, क्वारंटाईन केंद्रे , गावांतील घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी आणि ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे तास या साऱ्या कसरती एकहाती करूनही शेवटी शिक्षक नावाचे अनसंग हिरो दुर्लक्षितच राहिले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शाळा सुरु झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना आणि त्यांच्या  कुटुंबाना नाही का? कोविड योध्यांप्रमाणे काम करूनही शिक्षकांना त्यांचे मूळ पगार, शाळांचे अनुदान, हक्काच्या बदल्या यांसाठी झगडत असल्याची खंत शिक्षक , मुख्याध्यापक वर्गाकडून शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाकडून थँक अ टीचर ही मोहीम राबवली जात असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत त्यांची दखल का घेतली जात नाही? शासकीय कर्मचाऱ्यांना लागूंअसणारे सर्व लाभ शिक्षकांना का नाही असा प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केला आहे. आजही अनेक शिक्षकांना शासकीय ड्युटीच्या नावाखाली अशैक्षणिक कामांसाठी जुंपण्यात येते. सेवानिवृत्त होऊनही त्यांना पेन्शनसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. या सगळ्या कामातून सुटका जाहली तर शिक्षक स्वतःचे ज्ञानदानाचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडू शकतील आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण विभागाने हीच भेट द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

महाराष्ट्र सरकारने मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांवर आरटीई कायदा २००९ मध्ये स्वीकारून देखील आपले अनुदानाचे धोरण बदलूनही गेली १२ वर्षे विनाअनुदानित व ०८ वर्षे कागदोपत्री अनुदानीत जाहीर करून २० टक्क्यांवर मुस्कटदाबी करणा-या नाकर्तेपणामुळे अखेर अंशतः: अनुदानीत शिक्षक महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून सांगली ते बारामती पायी दिंडी प्रवास करीत आहरेत. गेली १० वर्षे काळा शिक्षकदिन व १६२ राज्यव्यापी आंदोलने करूनही शासनाला कोणत्याही प्रकारची जाग आली नसल्याने अखेर  याबाबत न्याय मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता साकडे घालणार असल्याचीमाहिती कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. दरवर्षी कला शिक्षक दिन साजरा करूनही शासनाला शिक्षकांच्या व्यथा आणि मारथीची हाल अपेष्टाच कळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

रात्रशाळेतील शिक्षक गणतीत तरी आहेत का ?
रात्री शाळेतील शिक्षकांना पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना, घरभाडे भत्ता व इतर लाभ देण्यासाठी सरकारने १७ मे २०१७ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला. तरीही तीन वर्षांपासून सर्व लाभापासून वंचित आहेत. ४ सप्टेंबरला शिक्षक दिनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन आपले प्रश्न ही त्यांच्यापुढे मांडले आहेत. र्तर शाळांना पूर्ण वेळ शाळांचा दर्जा द्यावा,  अनुकंपा भरतीला तात्काळ मान्यता द्यावी, निवडश्रेणी सरसकट २४ वर्षा नंतर लागू करावीच अशा मागण्या त्यांनी केल्या असून आता शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण विभाग शिक्षकांना मागण्या पूर्ण करून थँक्स म्हणणार का याची प्रतीक्षा असल्याचे शिक्षक परिषदेचे रात्रशाळा विभागाचे राज्य संयोजक निरंजन गिरी यांनी म्हटले आहे.

 

Web Title: The cowardly warrior named Shikshak is ignored ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.