कॉक्स ॲण्ड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:08 AM2020-11-28T04:08:46+5:302020-11-28T04:08:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येस बँकेत केलेल्या हजारो कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कॉक्स आणि किंग्जचे ...

Cox & Kings promoter arrested | कॉक्स ॲण्ड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

कॉक्स ॲण्ड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येस बँकेत केलेल्या हजारो कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कॉक्स आणि किंग्जचे प्रवर्तक पीटर केरकर ऊर्फ अजय अजित पीटर यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना ३ डिसेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

येस बँक प्रकरणी दाखल मनी लॉडरिंग प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने जून महिन्यात कॉक्स ॲण्ड किंग्जच्या कार्यालयात ईडीने छापे टाकले होते. याच प्रकरणात येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर अटकेत असून, याबाबत पहिले आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. ‘कॉक्स ॲण्ड किंग्ज ग्रुप ऑफ कंपनीज’कडे बँकेची ३,६४२ कोटींची थकबाकी आहे.

.......................

Web Title: Cox & Kings promoter arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.