Mumbai Train Update: कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:29 AM2019-01-14T10:29:38+5:302019-01-14T11:32:33+5:30
ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.
कुर्ला-टिळकनगर दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. मात्र हार्बर मार्गावरील या बिघाडामुळे अनेकांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : हार्बर मार्गावर कुर्ला आणि टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने #Mumbai
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 14, 2019
Central Railway: A crack was detected in tracks between Tilak Nagar and Kurla on harbour line at 9.27 am; it was rectified by 9.32 am. #Mumbai
— ANI (@ANI) January 14, 2019
Central Railway: A keyman named Mukesh Kumar did a heroic work after noticing the crack in the track & promptly stopped the motorman of the Panvel up local towards CSMT, and it averted a big possible accident. Railway to reward that motorman accordingly. pic.twitter.com/SEc1OXinov
— ANI (@ANI) January 14, 2019