Join us

आरेत नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर भेगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:49 AM

सिमेंट काँक्रिट रस्ताकाम दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह.

मुंबई : शहर रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत असलेले २,००० किमीचे रस्ते सिमेंट काँक्रिट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोरेगाव पूर्व आरे चेक नाका युनिट क्रमांक १६ व युनिट क्रमांक ३ येथे रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने या रस्त्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक लोक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

आरे ते मरोळ चेक नाका या ७.५ किमीच्या रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी सुरू झाले, सध्या या मार्गावर तीन किमीचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्याची माहिती येथील ठाकरे गटाचे संदीप गाढवे यांनी दिली. 

 कंत्राटदाराला दंड  :

  याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करून   पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच संबंधित कंत्राटदारावर ठोस कारवाई करून भेगा पडलेले रस्ते दुरुस्त करून घेण्याची मागणी गाढवे यांनी केली.  कंत्राटदाराला याबाबत रस्ते विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजवण्याचे काम सुरू केले असून, कंत्राटदाराला दंड देखील करण्यात आला आहे.

टॅग्स :आरेरस्ते सुरक्षा