लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालकाचे २१ लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना पायधुनी परिसरात घडली. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंब्रा परिसरातील शफीकुल शेख (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांचा पायधुनी परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. अशात कारखान्यात काम करणाऱ्या हफिजूल अनामुल शेख (२१) याच्याकडे दागिने बनविण्यासाठी दिलेले २१ लाख ७४ हजार रुपये किमतीचे सोने घेऊन आरोपीने पळ काढला. याप्रकरणी २६ मार्च रोजी ही घटना घडली. शेख नॉट रिचेबल झाल्यानंतर शेख यांनी पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.