समुद्रात कोसळले हेलिकॉप्टर
By admin | Published: November 5, 2015 03:37 AM2015-11-05T03:37:49+5:302015-11-05T03:37:49+5:30
मुंबई नजिकच्या समुद्रात बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास पवनहंसचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक ई. सॅम्युअल आणि सहवैमानिक टी.के. गुहा हे दोघे बेपत्ता झाले आहे.
मुंबई : मुंबई नजिकच्या समुद्रात बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास पवनहंसचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक ई. सॅम्युअल आणि सहवैमानिक टी.के. गुहा हे दोघे बेपत्ता झाले आहे.
अपघाताचे नेमके कारण समजले नसून नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राहुल सिन्हा यांनी हेलिकॉप्टरला जलसमाधी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. बॉम्बेहाय येथील तेल फलाटावर रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टर उतरवण्याचा सराव सुरू असतानाच हा अपघात घडला. मुंबईपासून पश्चिम उत्तर दिशेला ८० सागरी मैल अंतरापर्यंत हे हेलिकॉप्टर यंत्रणेच्या संपर्कात होते. नंतर मात्र संपर्क तुटला. नौदलाने त्याच्या शोधासाठी एक हेलिकॉप्टर, नाइट व्हीजन असलेले विशेष हेलिकॉप्टर आणि दोन युद्धनौकाही तातडीने रवाना केल्या. रात्री उशीरा हेलिकॉप्टरचे काही अवशेष बचाव पथकाला समुद्रात तरंगताना आढळले.