लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करून संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी- विद्यार्थिनी, त्यांचे पालक यांचा या ॲपमध्ये समावेश करावा, अशा मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
अहवाल सादर करा
मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील तरुणीच्या हत्येप्रकरणी वसतिगृहाच्या सुरक्षिततेबाबच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
पत्रातील मुद्दे
- राज्यातील वसतिगृहांतील विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी.
- विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. त्यासाठी वसतिगृह स्तरावर संवाद समिती स्थापन करावी. त्यामुळे महिला आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगतील. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलिस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी यांचा समावेश असावा.