मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हरखाली उद्यानांचे निर्माण करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:09 PM2020-12-24T18:09:34+5:302020-12-24T18:10:00+5:30

Create parks under flyovers : प्रत्येक ब्रिज खाली वेगवेगळ्या संकल्पना योजून उद्यान विकसीत करावी.

Create parks under the developing flyovers in Mumbai | मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हरखाली उद्यानांचे निर्माण करा

मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हरखाली उद्यानांचे निर्माण करा

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या माटुंगा फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली अतिशय सुंदर असं गार्डन बनविण्यात आलं आहे ज्याचं नाव आहे 'नानालाल मेहता गार्डन'. त्याच धर्तीवर आपल्या बोरीवली पश्चिम व पूर्वेकडे बनत असलेल्या प्रत्येक ब्रिज खाली वेगवेगळ्या संकल्पना योजून उद्यान विकसीत करावी व आपल्या नागरिकांना अनोखी भेट द्यावी. सदर मागणी ही भारतीय जनता पक्षाचे बोरीवली उपाध्यक्ष  सुधीर परांजपे यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना गेल्या दि,22 जून रोजी केली होती. दैनिक लोकमतने दि,26 जून रोजी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते.

बोरीवलीत व संपूर्ण मुंबईत मुंबई मेट्रो वन तसेच मुंबई महानगार पालिकेतर्फे अनेक फ्लायओव्हर ब्रीज सध्या पूर्व व पश्चिमेस बनण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या ब्रिज खालील जागेचा  वापर नंतर अनेकदा भंगार ठेवणे,झोपडपट्टी वा बहुतेक गैरकामांसाठीच केला जातो हे टाळण्यासाठी खासदार  शेट्टी यांनी दि,22 जून रोजी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून सुधीर परांजपे यांनी केलेल्या मागणीचा निश्चित विचार करुन नानालाल महेता उद्यानाच्या धर्तीवर बोरीवली,उत्तर  मुबई व संपूर्ण मुंबईत अशी उद्यानांच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेतली. याबाबत त्यांनी आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करून व दि.22 ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्तांना दिलेल्या स्मरणपत्राचे फलस्वरूप  म्हणून एच पूर्व कलानगर खेर नगर फ्लायओव्हर ब्रिज खाली  खा.गोपाळ शेट्टी यांनी मांडलेल्या संकल्पनेच्या आधारावर एक सुंदर उद्यान बांधण्याचे काम सध्या सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. मनपा आयुक्तांनी शेट्टी यांनी केलेली मागणी उचलून धरुन त्यावर काम सुरु केल्या बद्दल शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. येणाऱ्या आगामी काळात "स्वच्छ मुंबई - हरित मुंबईचे स्वप्न साकार  करुन मुंबईत परिवर्तन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Create parks under the developing flyovers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.