आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती; आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:27 AM2020-08-28T02:27:39+5:302020-08-28T02:27:57+5:30

लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अनेकांना, पालक, विद्यार्थी, शिक्षकांना हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती रोहित चौधरी आणि कवीन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी दिली.

Creation of AIR scanners from IIT students; Moving towards a self-reliant India | आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती; आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल

आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती; आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल

googlenewsNext

मुंबई : आत्मनिर्भर भारत उभारण्याच्या संकल्पनेला आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून हातभार लावला आहे. अ‍ॅडोब आणि कॅम स्कॅनरसारख्या चिनी अ‍ॅपना पर्याय देण्यासाठी आयआयटी बॉम्बेच्या पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एआयआर (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रीडिंग) स्कॅनरची निर्मिती केली आहे. भविष्यात हे अ‍ॅप्लिकेशन बाजारपेठेत विदेशी अ‍ॅप्लिकेशनना चांगली टक्कर देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अनेकांना, पालक, विद्यार्थी, शिक्षकांना हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती रोहित चौधरी आणि कवीन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी दिली. आयटीआयटी बॉम्बेच्या सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटच्या या विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. एखाद्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे, व्यवस्थापन आणि ते इतरांसोबत शेअर करण्यासारख्या प्राथमिक गरजा हे स्कॅनर पूर्ण करते. या अ‍ॅपच्या नावामध्येच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आहे. ज्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने  कागदपत्रांवरील मजकूर समजून घेतानाच ऐकताही येणार आहे. ज्या शब्दावर किंवा शब्दांच्या बॉक्सवर आपण टॅप करणार त्याचा अर्थ, त्याच्याशी संबंधित उदाहरणे, त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला अ‍ॅपमधून समजतील. इतकेच काय तर तब्बल ४० विविध भाषांमधून हे शब्द आपल्याला माहीत होणार आहेत.

आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात झाल्यावर आणि अनेक चिनी अ‍ॅपवर बंदी आल्यानंतर या रीडिंग अ‍ॅपवर काम करणाºया रोहित आणि कवीन याने यात स्कॅनरचे फीचरही टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. १५ आॅगस्टला अधिकृतरीत्या या अ‍ॅपचे अनावरण प्ले स्टोअरवर करण्यात आले. आता लोकांकडून येणाºया प्रतिक्रियांवर काम सुरू असून लवकरच त्यात आणखी फीचर टाकले जाणार असल्याची माहिती कवीन याने दिली.

आता फक्त या अ‍ॅपमध्ये ऐकण्याची सुविधा इंग्रजी भाषेत आहे. लवकरच आम्ही त्यात सुधारणा करून अनेक भारतीय भाषांचा समावेश करणार आहोत. जेणेकरून सामान्य व्यक्तीही या अ‍ॅपचा वापर करू शकेल. आमचे हे अ‍ॅप बाजारात आत्मनिर्भर भारत अभियानात महत्त्वपूर्ण संशोधन ठरेल इतके नक्की. - कवीन अग्रवाल, आयआयटी बॉम्बे, सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थी

Web Title: Creation of AIR scanners from IIT students; Moving towards a self-reliant India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.