स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 07:25 PM2020-09-25T19:25:36+5:302020-09-25T19:25:41+5:30

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे या मान्यवरांचा देखील उद्घाटन सत्रात सहभाग घेऊन विचार मांडले.

The creation of literature by looking at the world through the eyes of women is a feature of women's literature - Dr. Neelam Gorhe | स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

googlenewsNext

मुंबई : साहित्य मंजिरी या डिजिटल महिला साहित्य संमेलनास आज सुरुवात झाली. या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांतर्फे साहित्य 'मंजिरी' या करण्यात आले आहे. 
या साहित्य संमेलनाचे आज उदघाटन संमेलनाच्या अध्यक्ष प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले असून डॉ. नीलम गो-हे, मा. उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद या स्वागताध्यक्ष होत्या. तसंच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे या मान्यवरांचा देखील उद्घाटन सत्रात सहभाग घेऊन विचार मांडले.

सर्वांच्या सहभागातून  साहित्याचा  विकास होणे आवश्यक असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी महाराष्ट्रातील पहिले ऑनलाइन महिला साहित्य संमेलन संमेलनाचे उद्घाटन करताना आपल्या स्वागताध्यक्ष या नात्याने  भाषणामध्ये सांगितले.स्त्रियांच्या नजरेतुन जगाकडे पाहुन महिला साहित्याची निर्मिती झाली.आता शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि बीजिंग+ 25 वर्ष याबाबतही त्यांनी महिलांचे बदलते  वास्तव व विकासावर  आपले विचार प्रकट केले.

महिलांचा विकास हा सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या बरोबर होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती महिलांच्या मध्ये आपण निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  हे साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील पहिले ऑनलाइन महिला साहित्य संमेलन होते. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले होत्या. त्यांनी आपले विचार मांडताना महिलानी भाषेचा विचार न करता आपल्या प्रत्येक भावना योग्य प्रकारे लिहिल्या  पाहिजेत असे सांगितले. या भावना त्या आपल्या व्यक्तिगत असल्यामुळे याचा समाज मनावर  नक्की परिणाम होतो असे त्याने सांगितले. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या परीने व्यक्त होणे गरजेच आहे आणि त्या भावना एक आपला अमूल्य ठेवा आहे याचाही विचार करावा असे सांगितले.

स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आयोजित केलेले हे पहिलेच डिजिटल महिला साहित्य संमेलन आहे. हे पहिले डिजिटल साहित्य संमेलन ना. डॉ. गोऱ्हे हे यांच्यावर राहील, असे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. उद्घाटन  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. आयोजित डिजिटल महिला साहित्य संमेलन कार्यक्रम पहिल्या परिसंवादाच्या "महिलांच्या सर्जनशील साहित्याची नवी परिमाणे" या विषयात मोनिका गजेंद्रगडकर , राही भिडे, रोहिणी निनावे ह्या सहभागी होत्या. या परिसंवादाचे सुत्रसंचालन वैजयंती कुलकर्णी आपटे यांनी केले. माविमच्या राज्यस्तरीय ऑनलाईन उखाणा स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण कवियित्री संमेलन अनुपमा उजगरे , अंजली कुलकर्णी , छाया कोरगावकर, ज्योती ठाकरे ह्या सहभागी होत्या.

Web Title: The creation of literature by looking at the world through the eyes of women is a feature of women's literature - Dr. Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.