चिंध्यांच्या गाठोड्याने घेतला चिमुकल्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 07:05 AM2018-11-08T07:05:24+5:302018-11-08T07:05:35+5:30

घराशेजारी खेळताना गोदामाबाहेर ठेवलेल्या चिंधीच्या गाठोड्याखाली सापडून पाच वर्षांच्या बालकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना वडाळ्यातील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडली.

The creature taking the bundle of worms | चिंध्यांच्या गाठोड्याने घेतला चिमुकल्याचा जीव

चिंध्यांच्या गाठोड्याने घेतला चिमुकल्याचा जीव

Next

मुंबई  - घराशेजारी खेळताना गोदामाबाहेर ठेवलेल्या चिंधीच्या गाठोड्याखाली सापडून पाच वर्षांच्या बालकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना वडाळ्यातील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडली. सोहेल सर्वेश राजभर असे त्याचे नाव असून, ऐन सणासुदीला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सर्वेश राजभर हे पत्नी व दोन मुले, दोन मुलींसह चार महिन्यांपूर्वीच मुंबईत आले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मुलगा सोहेल दिवाळीनिमित्त नवीन कपडे घालून घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो चिंध्यांच्या गाठोड्याजवळ गेला असता, एक गाठोडे त्याच्या अंगावर पडले आणि तो गुदमरला.

Web Title: The creature taking the bundle of worms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू