‘भयाला मूठमाती देण्याचा संकल्प’ मनाशी बाळगून ‘लोकमत’ प्रतिनिधींनी नव्या वर्षाचे स्वागत स्मशान मोहीम आयोजित करून केले. समाजाने नवे वर्ष भयमुक्त वातावरणात जगावे, या उद्देशाने ही स्मशान मोहीम घेण्यात आली. ‘लोकमत’च्या या स्मशान मोहिमेला समाजातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी प्रतिसाद देत विज्ञानवादी चळवळीच्या दृष्टीने तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे म्हणत दाद दिली. समाजाच्या भयमुक्तीसाठी...‘लोकमत’ने आयोजित केलेली स्मशान मोहीम हे खऱ्या अर्थाने नव्या वर्षाचे स्वागत आहे. या माध्यमातून मानवी समाज भयमुक्त होण्याकडे हे सशक्त पाऊल आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘लोकमत’ने समाजासमोर निर्माण केलेला आदर्श हा विज्ञानवादी असून ही प्रबोधनाची नांदी आहे. कृतिशील चळवळ अंधश्रद्धेच्या पगड्यात असलेल्या समाजाला केवळ विचारांतून नव्हे, तर निर्भयपणे कृतीद्वारे ‘लोकमत’ने वेगळा पायंडा पाडला आहे. ही मोहीम अत्यंत स्तुत्य आहे. या मार्गाने देशाची जडणघडण झाली तर राज्यघटनेला अभिप्रेत असणाऱ्या वैज्ञानिक चळवळीकडे घेऊन जाणारे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, हे निश्चित.शिकवण देणारा उपक्रमसमाजात सण, उत्सव साजरे करण्याचे मूळ उद्देश हरविले आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर, ३१ डिसेंबरच्या रात्री ‘लोकमत’ने आयोजित केलेली मोहीम समाजाला नवी शिकवण देणारी ठरेल. गेली अनेक वर्षे समाजाला निरनिराळ्या अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकून गुंगी आली होती. या उपक्रमाद्वारे समाजाचे डोळे उघडतील.भीतीशी भिडणं कौतुकास्पद : गेल्या कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धेच्या जाचातून समाजाने मुक्त होण्यासाठी चळवळ सुरू आहे. याद्वारे विचारांमध्ये बदल घडवून आणण्याकरिता विविध पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसतात, मात्र नववर्षाच्या प्रारंभीच ‘लोकमत’ने स्मशान मोहिमेच्या प्रत्यक्ष कृतीद्वारे भीतीशी भिडणं खरंच कौतुकास्पद आहे. या मोहिमेला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कृतीद्वारे केलेले उपक्रम हे प्रबोधनासाठी महत्त्वाचे ठरतात, त्यामुळे असे अनेक उपक्रम ‘लोकमत’ने भविष्यातही राबवून सामाजिक भान जपावे.उपक्रम स्वागतार्हसमाज आता ज्या अंधश्रद्धांमध्ये अडकला आहे, त्याचे मूळ भूतकाळाशी घट्ट जखडलेले आहे. अनेक वर्षांपासून समाजाची मानसिकता, विचारांमध्ये प्रबोधन घडविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात ‘लोकमत’ अशा प्रकारची स्मशान मोहीम राबविणे हे स्वागतार्ह आहे. बदल घडविण्यासाठी हा कृतिशील आरंभ ठरेल.मोहीम स्तुत्यसमाजाला अंधश्रद्धांमधून मुक्त करण्यासाठी अशाच ‘कृतिशील’ उपक्रमांची गरज आहे. अंधश्रद्धा, अकल्पित गोष्टींच्या जाचात अडकलेल्या समाजाला ‘लोकमत’चा हा उपक्रम दिशा दाखविणारा ठरेल. ही मोहीम स्तुत्य असून याद्वारे जनजागृती घडेल. प्रबोधनाचा हा वारसा 'लोकमत'ने जपावा याच मनापासून शुभेच्छा. प्रबोधनासाठी महत्त्वाचे... समाजात ‘स्मशान’ या शब्दाशी वेगवेगळ्या संकल्पना जोडलेल्या असतात. त्यामुळे तेथील वातावरण, भीती आणि इतरही अकल्पित गोष्टींमुळे भीतीच्या वातावरणाला खतपाणी मिळते. अशी परिस्थिती असताना ‘लोकमत’ने हाती घेतलेली ही मोहीम प्रबोधनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.
स्मशान मोहिमेला दिग्गजांची दाद
By admin | Published: January 02, 2015 12:40 AM