क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण: चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 04:46 PM2023-02-20T16:46:17+5:302023-02-20T16:46:46+5:30
Cricketer Prithvi Shaw assault case: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली भोजपुरी अभिनेत्री सपना गिलसह चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई - क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली भोजपुरी अभिनेत्री सपना गिलसह चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सपना गिल लवकरच जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार, अशी माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.
पृथ्वी शॉ याला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी सपना गिल हिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होत. ही कोठडी आज संपुष्टात आल्याने ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर चारही आरोपींना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, सपना गिल लवकरच जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती सपना गिल यांचे वकील काशिफ खान यांनी दिली. पोलिसांनी कोर्टात तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.