Join us

भाजपा आमदारासह ५०० जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: January 31, 2016 2:14 AM

अनधिकृत जलजोडणीविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना जमावाकडून धक्काबुक्की करण्याची घटना शुक्रवारी अँटॉप हिल परिसरात घडली. त्याच्या प्रचंड विरोधामुळे

मुंबई : अनधिकृत जलजोडणीविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना जमावाकडून धक्काबुक्की करण्याची घटना शुक्रवारी अँटॉप हिल परिसरात घडली. त्याच्या प्रचंड विरोधामुळे कर्मचाऱ्यांना तेथून पळ काढावा लागला. या प्रकरणी सायन-कोळीवाडा मतदारसंघातील भाजपाचे आमदार कॅप्टन तमील सेल्वन यांच्यासह ५०० जणांविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटॉप हिल येथील इमारत क्रमांक २४ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत जलजोडणी केल्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली. या तक्रारीवरून शुक्रवारी दुपारच्या सुमारास पालिका कर्मचारी अनधिकृत जलजोडणीवर कारवाईसाठी गेले होते. स्थानिक भाजपा आमदार कॅप्टन तमील सेल्वन यांच्यासह ५०० जणांनी कर्मचाऱ्यांना घेराव घातला. या कारवाईला विरोध करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. पालिका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अँटॉप हिल पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सेल्वनसह स्थानिक सेना विभागप्रमुख मंगेश सातमकर आणि ५०० जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती अँटॉप हिल पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)