डॉक्टरांविषयी अफवा पसरविणारा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह भाष्य करीत कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या अध्यक्षा सुश्मिता भटनागर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पाल यांच्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संपर्क साधून डाॅक्टरांच्या विरोधात असलेला एक व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित केल्याचे २० एप्रिल रोजी भटनागर यांच्या नजरेस पडले. या व्हिडिओबाबत अन्य डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पाल यांनी यात कोरोना संकटात डॉक्टरांच्या विरोधात जनतेच्या भावना भडकाविणारे व लोकांना भयभीत करून त्यांच्यामध्ये डाॅक्टारांविषयी असंतोष निर्माण करणारे आक्षेपार्ह विधान केले आहे. या व्हिडिओमुळे डॉक्टरांबाबत गैरसमज पसरवून डॉक्टरांविरोधात हिंसाचार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वेळीच योग्य कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवीत अधिक तपास सुरू केला आहे.
............................