Join us  

विक्रमगडमधील पाच उमेदवारांवर गुन्हे

By admin | Published: October 12, 2014 11:22 PM

विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन न केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी सुशील खोडवेकर

जव्हार : विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन न केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनियंत्रित हेलीपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्यापूर्वी २४ तास अगोदर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय जव्हार येथे उतरविल्याबाबत भाजपाचे उमेदवार विष्णू सावरा, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन सटाणेकर व सचिव भरत सोनार यांच्यावर ९ आॅक्टोबरला गुन्हा दाखल झाला. तर वाहन तसेच लाऊडस्पीकर परवाना घेऊन सुद्धा तो प्रचार वाहनाच्या समोरील काचेवर दर्शनी भागात न लावल्याबाबत येथील मनसे उमेदवार भरत पांडुरंग हजारे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील चंद्रकांत भुसारा, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हेमंत गोविंद या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार रतन बुधर यांच्यावर याच गुन्ह्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती सुशील खोडवेकर यांनी दिली. उमेदवार, प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे यासाठी खोडवेकर यांनी वेळोवेळी उमेदवार व प्रतिनिधींच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. २०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड मतदारससंघातील प्रशाासनाने केलेले सुयोग्य नियोजन वेबसाईटींगचा यशस्वी प्रयोग याची प्रशंसा भारतीय निवडणूक आयोगाने केली होती. (वार्ताहर)