एमआयएम उमेदवारावर गुन्हा
By admin | Published: February 20, 2017 07:03 AM2017-02-20T07:03:00+5:302017-02-20T07:03:00+5:30
जमावबंदी असताना एमआयएमच्या उमेदवारांसह कार्यकर्ते जमल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : जमावबंदी असताना एमआयएमच्या उमेदवारांसह कार्यकर्ते जमल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे २२१ प्रभागाचे उमेदवार निसार अहमद शेख यांच्यासह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायधुनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२च्या सुमारास शेख आणि त्यांचे कार्यकर्ते येथील इस्माईल कर्टे रोड जंक्शनवर गर्दी करून उभे होते. हा विभाग संवेदनशील असल्याने या ठिकाणी जमावबंदीचे आदेश बजाविण्यात आले होते. पण उमेदवारांसह ही मंडळी या ठिकाणी उभी होती. ही बाब पायधुनी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना गर्दी हटविण्यास सांगितले. मात्र तरीदेखील ते तेथून निघाले नाही. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी रात्री उशिराने शेख यांच्यासह ७ पदाधिकारी आणि १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)