Join us

आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी मनसे नगरसेवकावर गुन्हा

By admin | Published: February 05, 2017 7:34 AM

दादरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्याविरोधात महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 - दादरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्याविरोधात महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकी आधीच सुधीर जाधव अडचणीत येणार असल्याचे दिसते. 
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर जाधव आपल्या पत्नीच्या निवडणूक प्रचारादरम्यान या महिलेच्या घरात आले. यावेळी त्यांनी या महिलेचा मोबईल नंबर घेऊन तिला रात्रीच्यावेळी आक्षेपार्ह असे व्हिडिओ आणि मेसेज पाठविले. दरम्यान, याप्रकरणी या महिलेने सुधीर जाधव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
या प्रकरणामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी आधीच सुधीर जाधव अडचणीत सापडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.