जातीवाचक शिवीगाळ करणा-यांवर गुन्हा

By admin | Published: November 20, 2014 11:14 PM2014-11-20T23:14:25+5:302014-11-20T23:14:25+5:30

मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशालता बाळकृष्ण बिरवाडकर या बुधवारी कार्यालयात काम करीत असताना

Crime against nonsensical scholars | जातीवाचक शिवीगाळ करणा-यांवर गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ करणा-यांवर गुन्हा

Next

अलिबाग :मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशालता बाळकृष्ण बिरवाडकर या बुधवारी कार्यालयात काम करीत असताना, तेथे मद्यधुंद अवस्थेत आलेल्या शरद बाळकृष्ण चवरकर व धनंजय गंगाराम रोटकर यांनी ग्रामसेविका बिरवाडकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व मुंबई दारुबंदी कायद्यानुसार रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्या पासून शरद बाळकृष्ण चवरकर व धनंजय गंगाराम रोटकर हे दोघेही फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Crime against nonsensical scholars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.