अलिबाग :मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशालता बाळकृष्ण बिरवाडकर या बुधवारी कार्यालयात काम करीत असताना, तेथे मद्यधुंद अवस्थेत आलेल्या शरद बाळकृष्ण चवरकर व धनंजय गंगाराम रोटकर यांनी ग्रामसेविका बिरवाडकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व मुंबई दारुबंदी कायद्यानुसार रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्या पासून शरद बाळकृष्ण चवरकर व धनंजय गंगाराम रोटकर हे दोघेही फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)
जातीवाचक शिवीगाळ करणा-यांवर गुन्हा
By admin | Published: November 20, 2014 11:14 PM