CoronaVirus News in Mumbai: लोकसेवक असल्याचे सांगून फिरणाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:41 AM2020-05-02T00:41:00+5:302020-05-02T00:41:18+5:30

मोहम्मद इक्बाल अब्दुल कनन (५४) आणि त्यांचे बंधू अब्दुल सलीम (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against those who claim to be public servants | CoronaVirus News in Mumbai: लोकसेवक असल्याचे सांगून फिरणाऱ्यांवर गुन्हा

CoronaVirus News in Mumbai: लोकसेवक असल्याचे सांगून फिरणाऱ्यांवर गुन्हा

Next

मुंबई : लॉकडाउनच्या काळात बाहेर पडण्यासाठी काही जण आमदार, लोकसेवक असल्याचे भासवून फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांकडूनही त्यांची धरपकड सुरू असताना माटुंगा पोलिसांनी आणखी एका कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात मोहम्मद इक्बाल अब्दुल कनन (५४) आणि त्यांचे बंधू अब्दुल सलीम (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माटुंगा येथील पाच उद्यान परिसरात नाकाबंदी सुरू असताना आमदार, विधानसभा सदस्य असे स्टीकर चिकटवलेली एक स्कॉर्पिओ पोलीस पथकाने अडवली. या गाडीवर मानवीहक्क आयोग, राजमुद्रा आणि वाहतूक पोलिसांचेही स्टीकर लावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी चालक मोहम्मदकडे केलेल्या चौकशीत हे वाहन त्याचा भाऊ अब्दुल याच्या नावावर होते. हे दोघेही लोकसेवक असल्याचे भासवून वावरत होते. तसेच त्यांचे संबंधित स्टीकरपैकी कुणाशीच संबंध नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानुसार या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Crime against those who claim to be public servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.