मुंबई : स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जळगावच्या व्यापारी सुनील गुजरविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजर यांचे समुपदेशन करीत त्यांना सुखरूप घरी पाठविण्यात आले आहे.
....
व्यावसायिक फसवणूक
मुंबई : नेपियन्सी रोड परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची एका दाम्पत्याने दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना फोर्टमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस तपास करीत आहेत.
....
बनावट नोटाप्रकरणातील आरोपींचा शोध सुरू
मुंबई : बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी अताऊर अयुब अली रेहमान (वय २८) याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्याने बांग्लादेशातून बनावट नोटा पुरवल्या होत्या. त्याच्या अन्य साथीदाराबाबत अधिक चौकशी करीत आहेत.
....
बनावट कागदपत्रांद्वारे मिळविली नोकरी
मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे पालिकेत नोकरी मिळवून २८ वर्षे काम करणाऱ्या रमेश शेलार याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रमेश शेलार १९९३ मध्ये महानगरपालिकेत माळी म्हणून कामाला लागला. महानगरपालिकेमध्येच काम करणाऱ्या मारुती साबळे या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर रमेश शेलारने महानगरपालिकेत कामाला लागण्यासाठी केला होता. एकाच नावाने दोन कर्मचारी असल्याचे समजताच हा प्रकार उघडकीस आला आहे.
....