खार पोलिसांत ‘युनायटेड फॉस्फरस’वर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:13 AM2019-04-17T05:13:38+5:302019-04-17T05:13:42+5:30
युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात बेकायदा चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनविण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते.
मुंबई : युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात बेकायदा चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनविण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते. या प्रकरणी स्थानिक कायद्यांतर्गत अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत, त्याच्या चौकशीची परवानगी खार पोलिसांनी न्यायालयाकडून घेतली आहे.
खारमध्ये ९ एप्रिलला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीची मालकी असलेल्या इमारतीत भारतीय सैन्य, विमाने आणि मोदींचा संदेश असलेल्या इलेक्ट्रॉनिक काडर््सचा मोठा साठा हस्तगत केला होता. ‘या प्रकरणी स्थानिक कायद्यांतर्गत अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत न्यायालयाला विचारून त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळवली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.