Crime: अरमान खत्रीची रवानगी न्यायालयीन कोठडीत, दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:09 PM2023-04-16T12:09:34+5:302023-04-16T12:09:48+5:30

Crime News: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अरमान खत्रीला विशेष एससी/ एसटी न्यायालयाने शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Crime: Armaan Khatri sent to judicial custody, Darshan Solanki suicide case | Crime: अरमान खत्रीची रवानगी न्यायालयीन कोठडीत, दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण

Crime: अरमान खत्रीची रवानगी न्यायालयीन कोठडीत, दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण

googlenewsNext

 मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अरमान खत्रीला विशेष एससी/ एसटी न्यायालयाने शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

एसआयटीने अरमानच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली. अरमानच्या मोबाइलचा एफएसएल रिपोर्ट मिळाला असून, त्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनने अरमानची माफी मागितली. अरमान मला माफ कर, मी मुंबई सोडून जात आहे, असा मेसेज दर्शनने अरमानला पाठवला, तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालकांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती एसआयटीने न्यायालयाला दिली.

सध्या कॉलेज सुरू असल्याने सहविद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अरमानच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात  यावी, अशी विनंती एसआयटीने  न्यायालयाला केली. 

एसआयटीची विनंती अमान्य...
बचाव पक्षाच्या वकिलांनी एसआयटीच्या विनंतीला विरोध केला. आधीच सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिमांड अर्जात नवीन काही नाही. अरमान सराईत गुन्हेगार नाही. तो तपासाला सहकार्य करत आहे, असे अरमान खत्रीचे वकील दिनेश गुप्ता यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने एसआयटीची विनंती अमान्य करत अरमानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर अरमानच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर लवकरच सुनावणी घेण्यात येईल.

Web Title: Crime: Armaan Khatri sent to judicial custody, Darshan Solanki suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.