ऑर्केस्ट्रा बार, हुक्का पार्लरसह ११ ठिकाणी गुन्हे शाखेच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:25+5:302021-03-26T04:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आलेली पहावयास मिळाली. यात, ११ ऑर्केस्ट्रा बार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आलेली पहावयास मिळाली. यात, ११ ऑर्केस्ट्रा बार, हुक्का पार्लर, मटका आणि जुगाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने धाडी टाकून कारवाई केली. यात १००हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गुन्हे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेने कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन ११ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.
यावेळी दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या प्रसिद्ध बारवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १००हून अधिक जणांवर कारवाई झाली.
....................