कांदिवलीत एसआरए प्रमोटरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:15+5:302020-12-17T04:34:15+5:30
आर दक्षिणच्या वार्ड ऑफिसरने केली तक्रार दाखल बातमी मस्ट आहे गौरी टेंबकर - कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
आर दक्षिणच्या वार्ड ऑफिसरने केली तक्रार दाखल
बातमी मस्ट आहे
गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीच्या अभिलाखनगरमध्ये महालिका अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणारा चीफ एसआरए प्रमोटर आणि त्याच्या साथीदारावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आर दक्षिणचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून, सध्या त्यांचा शोध सुरू आहे.
अरविंद दुबे आणि त्याच्या एका साथीदारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिमच्या अभिलाखनगर परिसरात नालाकटिंगमध्ये जवळपास २०० झोपड्यांना स्थलांतरित करून त्यांना सरकारकडून घरे दिली जाणार आहेत. त्याच्याच सर्वेक्षणासाठी मंगळवारी कुऱ्हाडे आणि त्यांच्या पथकाने अभिलाखनगरमध्ये भेट दिली. त्यावेळी दुबे आणि त्याच्या साथीदाराने स्थानिकांना मोठ्या संख्येने गोळा करत, अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली, तसेच पालिका अधिकाऱ्यावरही चुकीचे आरोप करू लागला. त्यानुसार, कुऱ्हाडे यांनी अखेर या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात दुबे आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाखनगरमध्ये असलेल्या जवळपास १,८०० झोपड्यांपैकी १,१०० झोपड्यांची नोंद दुबे याच्यामार्फत एसआरए कार्यालयात करण्यात आली आहे. ज्यात नालाकटिंगमध्ये जाणाऱ्या या २०० झोपड्यांचाही समावेश आहे. या झोपड्यांची संख्या कमी झाल्यास, मेजॉरिटीअभावी राजकीय वरदहस्त असलेल्या दुबेला एसआरएअंतर्गत काम करता येणार नाही. त्यामुळे तो पालिका अधिकाऱ्याविरोधात नागरिकांची दिशाभूल करत असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, कांदिवली पोलीस त्याचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.