जुहूतील रिहाब रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:06 AM2021-03-21T04:06:37+5:302021-03-21T04:06:37+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुहूतील रिहाब रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल ...
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुहूतील रिहाब रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही निष्काळजीपणाने वागणाऱ्या नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून हे रेस्टॉरंट सुरू असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांना मिळाली हाेती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी उशिरा रात्री रेस्टॉरंटवर धाड टाकली, तेव्हा तेथे ७० ते ८० लोक सोशल डिस्टन्सिंग न पाळताच घोळका करून जमा झालेले त्यांना दिसले. तसेच १०० हून अधिक लोकांनी मास्क घातला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने रेस्टॉरंट मालक महेंद्र आर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.