सोनसाखळी चोरणाऱ्याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:39 AM2018-06-13T04:39:19+5:302018-06-13T04:39:19+5:30
जुगार खेळण्यासाठी मेल-एक्स्प्रेस प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया परप्रांतीयाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. चक्कनलाल बाबूलाल सोनकर (४०) असे या आरोपीचे नाव आहे.
मुंबई - जुगार खेळण्यासाठी मेल-एक्स्प्रेस प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया परप्रांतीयाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. चक्कनलाल बाबूलाल सोनकर (४०) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एकूण ५ लाख ८३ हजार रुपये किमतीचे २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जुगारासाठी पैसे हवेत म्हणून आरोपी उत्तर प्रदेशहून मुंबईला चोरी करण्यासाठी येत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे.
मुंबई रेल्वेमधील दुर्लक्षित समजल्या जाणाºया पनवेल-दिवा मार्गावर सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी या मार्गावरील मेल-एक्स्प्रेसमध्ये साध्या वेशातील दोन विशेष पथके तैनात केली होती. ६ जून रोजी रात्री गस्त घालत असताना पहाटेच्या सुमारास एक्स्प्रेसमधून या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीअंती पनवेल-दिवा मार्गावर तब्बल ९ गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे मध्य रेल्वे परिमंडळाचे उप-आयुक्त समाधान पवार यांनी सांगितले.
मूळचा उत्तर प्रदेश येथील महाराणी गंज गोसियाना येथे आरोपी राहत होता. दोन-तीन महिन्यांतून एकदा चोरी करणाच्या उद्देशाने आरोपी मुंबईत येऊन हॉटेलमध्ये राहत होता. घरची आर्थिक परिस्थिती ठीकठाक होती, मात्र जुगार खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून आरोपी मुंबईला चोरी करण्यासाठी येत
होता.
चोरीचे दागिने दलालामार्फत झवेरी बाजार येथे विकून त्या पैशातून मूळ गावी जाऊन जुगार खेळण्याचा नाद आरोपीला होता. या प्रकरणी दलाल विंकल शहा यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
असे करायचे चोरी
पनवेल-दिवा मार्गावरील मेल-एक्स्प्रेसमध्ये रात्री प्रवेश करायचे. संपूर्ण एक्स्प्रेस फिरून दरवाजालगतच्या खिडकीत दागिने घालून बसलेल्या प्रवाशांचा शोध घेत असत.
मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेत मेल-एक्स्प्रेस सिग्नलला अथवा अन्य कारणामुळे हळू झाल्यास आरोपी प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून मेल-एक्स्प्रेसच्या विरुद्ध दिशेने पळ काढत असत.
‘परे’वरही
१० गुन्हे
आरोपीवर पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांत एकूण
१० गुन्हे नोंद झाले आहेत. वसई-विरार स्थानकांवर अशाच पद्धतीने चोरी करत होता.
या विशेष पथकाने
केली कारवाई
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक
चंद्रकांत रासम, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोख होळकर, हवालदार गजानन शेडगे, बिपीन पाटील, संतोष भांडवले, महिला हवालदार मीनाक्षी गोहिल, पोलीस नाईक वृषाली मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.