Crime News: ‘टेक केअर’चा संदेश अन् पोलिसाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:38 AM2023-01-30T08:38:57+5:302023-01-30T08:39:15+5:30

Crime News: कुटुंबीयांना ‘टेक केअर’चा संदेश पाठवत सहायक पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टी येथे घडली. प्रकाश थेतले (३८) असे मृत पोलिसाचे नाव असून, ते कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

Crime News: Message of 'Take care' and police suicide | Crime News: ‘टेक केअर’चा संदेश अन् पोलिसाची आत्महत्या

Crime News: ‘टेक केअर’चा संदेश अन् पोलिसाची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई : कुटुंबीयांना ‘टेक केअर’चा संदेश पाठवत सहायक पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टी येथे घडली. प्रकाश थेतले (३८) असे मृत पोलिसाचे नाव असून, ते कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 
थेतले २१ डिसेंबरपासून आजारपणाच्या रजेवर होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा पगार बंद होता. त्यातच गेल्या वर्षी त्यांना क्षयरोगाचे निदान झाले होते. थेतले यांच्यावर उपचार सुरू होते. त्यात त्यांना दारूचे व्यसन जडले. त्यामुळे ते नेहमी गैरहजर राहत होते. त्यांची गेल्या वर्षी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात बदली झाली होती.  शनिवारी मध्यरात्री चुनाभट्टी येथील राहत्या घरी असताना, कुटुंबीयांना ‘टेक केअर’चा संदेश पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यापश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असे कुटुंबीय आहेत.

Web Title: Crime News: Message of 'Take care' and police suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.