मानखुर्दमध्ये रेल्वेची कॅश व्हॅन अडवून १७ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:05 AM2018-06-14T05:05:16+5:302018-06-14T05:05:16+5:30

रेल्वेच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन चौघांनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मानखुर्द येथील धोबी घाटजवळील सर्व्हिस रोडवर घडली.

Crime news mumbai | मानखुर्दमध्ये रेल्वेची कॅश व्हॅन अडवून १७ लाख लुटले

मानखुर्दमध्ये रेल्वेची कॅश व्हॅन अडवून १७ लाख लुटले

Next

मुंबई : रेल्वेच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन चौघांनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मानखुर्द येथील धोबी घाटजवळील सर्व्हिस रोडवर घडली. एका मोटारीतून आलेल्या चौघा दरोडेखोरांनी व्यवस्थापक व सुरक्षारक्षकाला पिस्तूल तसेच चाकूचा धाक दाखवून व्हॅनमधील १६ लाख ५८ हजार २१२ रुपयांची रोकड लांबविली. उपनगरात नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना पकडण्यात यश आले नव्हते.
मानखुर्द रेल्वे स्टेशनमध्ये तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून
बुधवारी ३.४५च्या सुमारास कॅश व्हॅन (एमएच-०१-बीडी८१६१) मधून घेऊन जात होते. चालक वैभव
शिंदे याच्याशिवाय मॅनेजर व सुरक्षारक्षक व्हॅनमध्ये होता. व्हॅन धोबी घाट येथील सर्व्हिस रोडवरून
जात असताना मोटार (एम.एच.०२-एके-६०५८) आडवी घालून
व्हॅन अडविली. त्यातून उतरलेल्या चौघा जणांनी आपल्याकडील
पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पैशांची बॅग काढून घेतली. त्यानंतर
ते कारमधून वाशीच्या दिशेने
निघून गेले.
काही मिनिटांतच हा प्रकार घडल्याने मॅनेजर, सुरक्षारक्षक भीतीने गोंधळून गेले. त्यांनी कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती दिली.

Web Title: Crime news mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.